सॉफ्टफुटबॉल
सॉफ्टफुटबॉल हा खेळ सॉफ्टबॉल ,बेसबॉल , फुटबॉलया तिन्ही खेळाच्या एकत्रीकरणातून या खेळाचे जनक प्रा.संतोष खेंडे यांनी सॉफ्टफुटबॉल या नवीन खेळाची संकल्पना जगासमोर मांडली व ती प्रत्यक्षात आणली.सॉफ्टफुटबॉल खेळ प्रथमच जगामध्ये भारत देशामधील महाराष्ट्र राज्यामधील सोलापूर शहरात प्रा.संतोष खेंडे यांच्या कल्पनेतून हा खेळ प्रथमतः तय्यार केला.सॉफ्टफुटबॉल या खेळाची संपूर्ण नियमावली यांनी तयार केली .
सॉफ्ट फुटबॉल, बेसबॉल,फुटबॉल हे खेळ महागडा खेळ असल्याने उदा. बेसबॉल ग्लोज , बॉल , स्लगर(बॅट) ,मास्क , व इतर हा एकूण खर्च ३००००/- रु च्या पर्यंत जातो . हा खर्च कमी करून कमी खर्चात सॉफ्टबॉल , बेसबॉल ,फुटबॉल या खेळाचा आनंद मिळवला पाहिजे म्हणून हेच खेळ पायाने हा खेळ खेळून पहिला व या म्हणून नवीन सॉफ्टफुटबॉल या खेळाची निर्मिती केली.
भारतीय सॉफ्टफुटबॉल फेडेरेशन चे अध्यक्ष म्हणून हा खेळ तययर करण्यामागे राजाश्रय व मुख्य प्रेरक सी.ए.विनोद भोसले, उपाध्यक्ष श्री.वैजिनाथ हत्तुरे, सचिव सॉफ्टफुटबॉलचे जनक प्रा.संतोष खेंडे व इतर पधादिकारी कार्य करत आहेत.
तसेच हा खेळ तय्यार करताना प्रेरणास्थान मार्गदर्शक म्हणून लाभलेले गुरुवर्य प्रा.संतोष गवळी महाराष्ट्र सॉफ्ट फुटबॉलचे सचिव डॉ.प्रदीप तळवेलकर , प्रशांत जगताप , महाराष्ट्र बेसबॉल असो.चे सचिव श्री राजेंद्र इखनकर , श्री अशोक सरोदे , महाराष्ट्र पेन्टाक्यू असो.चे सचिव प्रदीप साखरे , सॉफ्टबॉल चे एन.आय.एस.कोच किशोरजी चौधरी , संदीप लेंबे ,ज्ञानेश काळे , डॉ.सुराजसिंग यवतीकर , प्रवीण मानवटकर , सुनील डावकर , प्रा. विश्वजित आहेरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सॉफ्टफुटबॉल हा खेळ तय्यार करण्यामागे प्रा.संतोष खेंडे यांचे मुख्य हेतू हा खेळ गरिबातल्या गरीब खेळाडूंना देखील खेळता यावा. कारण या खेळात साहित्य म्हणून फक्त २५०/- रु बॉल ची अवश्यक्यात आहे . मैदानासाठी कमीत कमी जागा लागते .प्रत्येक शाळेत व महाविद्यालयात हा खेळ खेळता येतो.जास्तीत जास्त खेळाडू तय्यार करावे.हा खेळ खेळताना खेळाडूंना सॉफ्टबॉल , बेसबॉल , फुटबॉल हे तिन्ही खेळ खेळात असल्याचा आनंद मिळतो.
प्रथमच फुटबॉल या खेळाला गोलमधून रन मध्ये रूपांतर केले. या सॉफ्टफुटबॉल खेळामुळे खेळाडूंची चपळता ,एकाग्रता , लवचिकता , वेग , दमदारता , आत्मविश्वास वाढतो.