खेळातील सर्वसाधारण नियम (Rules)
1) सर्वप्रथम हा खेळ नाणेफेक करून सुरू केला जातो.
2) नाणेफेक जिंकणायाने किक किंवा क्षेत्ररक्षण (fielding) घेतले पाहिजे.
3) त्यानंतर दोन्ही कर्णधार कोच मॅनेजरने किकींग ऑर्डर 1 ते 16 संपूर्ण नाव व प्लेस व जर्सी नंबर सोबत
भरून दिली पाहीजे.
4) हा खेळ 3, 5, 7 व 9 इनींगचा आहे. स्पर्धेच्या स्तरानुसार व सहाभागी संघानुसार व आयोजकास
विचारात घेऊन तो किती इनींग खेळविला पाहिजे.
5) तीन खेळाडू बाद झाल्यावर एक इनींग संपते.
6) दोन्ही संघाचे तीन तीन खेळाडू बाद झाल्यावर एक इनींग पुर्ण होर्इल असे 3 पुर्ण इनींग खेळविले जार्इल
7) तीन पुर्ण इनींग झाल्यावरच सामन्याचा निकाल जाहीर केला जार्इल.
8) तीन इनींगची मॅच असताना एखादया संघाचे एका इनींग मध्ये Differnce of 10 दुसया संघाच्या
एकूण होमरनापेक्षा दहा होमरनाचा फरक असेल तर तो सामना तेथेच संपवून निर्णय दिला जार्इल.
9) पाच इनींगची मॅच असताना दोन्ही संघाचे पूर्ण तीन इनींग संपल्यानंतर पंधरा होमरनाचा फरक असेल तर
तो सामना तेथेच संपवून निर्णय दिला जार्इल.
10) सात इनींगच्या स्पर्धेत दोन्ही संघाचे पाच इनींग पूर्ण झाल्यानंतर संपल्यानंतर पंधरा होमरनाचा फरक
असेल तर तो सामना तेथेच संपवून निर्णय दिला जार्इल.
11) नऊ इनींगच्या स्पर्धेत दोन्ही संघाचे सात इनींग पूर्ण झाल्यानंतर संपल्यानंतर पंधरा होमरनाचा फरक
असेल तर तो सामना तेथेच संपवून निर्णय दिला जार्इल.
12) एखादा सामना बरोबरीत किंवा टाय झाला तर एक इनींग वाढविले पुन्हा टाय झाल्यास अजून एक
इनिंग वाढविली जाते पुन्हा टाय झाल्यास सामना ज्या संघाची किकींग असेल त्यांची किकींग ऑर्डर पुन्हा
चालू होर्इल त्यांचे शेवटचे बाद किकर हा थर्ड बेसवर उभा असेल तेथून किकींग चालू होइल . त्यातूनही
टाय झाला तर निर्णय नाणेफेकीवर (toss)दिला जार्इल.
13) जर चालू सामन्यात पाऊसामुळे खेळ थांबला तर नंतर तो खेळ होमप्लेट अंपायरच्या निर्णयानुसार
सामना होऊच शकत नाही असे असल्यास तेव्हा तीन इनींगचा सामना असल्यास दोन पुर्ण इनींग झाले
असल्यास त्यावरच निर्णय दयावा.
पाच इनींगचा सामना असल्यास तीन पुर्ण इनींग झाले असल्यास त्यावरच निर्णय दयावा.
सात इनींगचा सामना असल्यास पाच पुर्ण इनींग झाले असल्यास त्यावरच निर्णय दयावा.
नऊ इनींगचा सामना असल्यास सात पुर्ण इनींग झाले असल्यास त्यावरच निर्णय दयावा.
2,3,5,7 यामध्ये कोणत्याही एका संघाचे एवढे इनींग पुर्ण झाले पाहिजे
किंवा एवढे इनींग झाले नसतील तर दुसया दिवशी सामना नव्याने (Rematch) सुरू करावा
पुढचा दिवस शिल्लक नसेल तर सामन्याचा निर्णय नाणेफेकीवर केला जार्इल
प्लेससाठी (Ist IInd IIIrd)साठी सामना असेल तर नाणेफेक किंवा पुरस्कार विभागून ( प्लेस विभागातून ) दिला जार्इल या दोन्हीपैकी एक निर्णय दोन्ही संघाचे कोच कॅप्टन यांना बोलावून घेतला जार्इल.