पंच (Umpire)
या खेळात प्लेट अंपायर मुख्य पंच 3 बेसचे पंच 2 स्कोअरर असा पंचाचा स्कॉड असतो 1 + 3 + 3 = 6 पंच
पंच कर्तव्ये (Umpire Duties)
मुख्य पंच (होम प्लेट अंपायर)
होमप्लेट अंपायर हा सामन्याचा मुख्य पंच असतो . त्याचा निर्णय हा अतिम निर्णय असतो
a) होम प्लेट अंपायरने हा संपूण्र्अ सामन्यावर नियंत्रण ठेवतो
b) पिचिंगचे पिचरचे स्ट्राइक व बॉल काउन्ट हा होमप्लेट पंच देतो
c) किकरला इकिंगबॉक्समध्ये बोलावणे , किकर अप कॉल देणे , पिचरला प्ले बॉल म्हणून डॉट देणे हे होम प्लेट अंपायरला करतो
d) किकर आउटआणि सेफ प्लेट पंच देतो
e) फाऊल किक कॉल प्लेट पंच देतो
f) किकर किक मारताना बॉल इन प्ले फाऊल बॉल चे कॉल प्लेट पंच देतो
g) होमप्लेट वरील सर्व निर्णय प्लेट अंपायर देतो
h) होमरन काउंट I, II, III बेस सेफ इ सर्व निर्णय प्लेट पंच देतो
I) illegal पिच आटी चेअरींग इ वरील निर्णय प्लेट पंच देतो
J) इनिंग चेंज इनिंग स्टार्ट इनिंग स्कोअर सांगणे हे प्लेट पंच करतो
K) सामन्याचा निकाल घोषित करणे
L) टाइम आउट देणे व टाइम अप करणे
M) मॅचची सूरूवात व शेवट करणे
N) स्पर्धेतील मैदानतील सर्व एक्युपमेंट गणवेष व्यवस्थित असल्याची खात्री करणे
O) प्लेट अंपायर हा नेहमी कॅचरमागे डोळ्यासमोर होमप्लेट दिसेल अश्या ठिकाणी उभा असतो
Ist बेस पंच
1) Ist बेस पंच I बेसच्या लाइनच्या मागे उभा असतो
2) Ist बेस अंपायरने फर्स्ट बेसवरील सर्व निर्णय त्याने दयावे
3) Ist बेस व्यवस्थित आहे कि नाही ते तपासावे व त्या कॉर्नरलाच ठेवावे
4) Ist बेसवरील सेफ व आऊटचे निर्णय तेा देतो|
5) Ist बेस आतून व बाहेरून जाणारा बॉल इन प्ले व फाऊल बॉल याचे इशारे व निर्णय तो देतो|
6) स्लाइड आऊट तोच देतो
7) बेसवर अर्लि रन तोच आऊट तोच देतो.
8) पिचर इललिगल पिच टाकत असेल तर तसे अंपायरला सांगतो व इललिगल पिच झाल्याचे दर्शिवितो
9) इन फिल्ड फ्लाय रूल तो दर्शिवितो
10) होमरन आहे कि नाही ते तपासतो व निर्णय देतो
11) बॉडी टॅग झाला की नाही ते चेक करून निर्णय देतो
12) दोन्ही संघाच्या कोचवर व खेळाडूवर नियंत्रण ठेवतो
13) किकर किक स्वींग केली की नाही याची माहिती प्लेट अंपायर विचारल्यास तो सांगतो
IInd बेस पंच
1) IInd बेस पंच II बेसच्या लाइनच्या मागे उभा असतो
2) सुरूवातीला तो बेस व्यवस्थित आहे कि नाही ते पाहून II बेसच्य जागेवर ठेवावे
3) IInd बेसवरील सेफ आणि आऊट चे निर्णय तो देतो
4) अर्लि आऊट अपील तो निर्णय देतो|
5) बॉल बॉडी ला टॅग झाला की नाही ते चेक करून निर्णय देणे
6) बेस टच किंवा बॉडी टॅग परिस्तिथिनुसार सेफ किव्हा आऊट देणे
IIIrd बेस पंच
1) IIIrd बेस पंच III बेस लाइनच्या थोडे पाठीमागे उभा असतो
2) Ist बेस अंपाायर्सचे सर्व कार्य तोच कार्य IIIrd बेसअंपायर करतो
स्कोअरर व असीस्टंट
स्केाअररने नेटच्या मागे टेबल व खुर्चीवर बसावे तसेच सुरूवातीस आपले साहित्य स्केाअर शीट लट्ठन उप फॉर्म लाल लाल काळा निळा बॉलपेन मार्कर स्टेपलर पॅड पंचीग इ बॉक्स फाइल बॅग इ साहित्य असावे
तसेच सुरूवातीस लाइन अप फॉर्म व किकिंग ऑर्डर भरून घ्यावे
संपूर्ण स्कोअर शीट भरावे सामन्याची सर्व गोष्टिची नोंद स्कोअर शीट वर स्केाअरचे प्लेट अंपायर व बेस अंपायरच्या निर्णयकडे लक्ष असावे सामन्याच्या निकाल प्रत्येक इनिंगचा निकाल मुख्य पंचाना वेळोवेळी सांगणे सामन्याची स्केाअरची करावे
पंचांची इशारे (Umpire Signals)
1) प्ले बॉल : प्लेट पंचानी प्ले म्हणणे व पिचरला डावा हात समोर करून बॉल टाकण्यास बोटांच्या साहाय्याने सांगणे
2) स्ट्राइक : पंचाचा स्ट्राइक म्हणुण जोरात सांगणे व उजव हात डोक्याच्या वर सरळ करणे व मूठ बंद करणे. हाताचा कोपरा थोडासा फोल्ड करणे. बोटाच्या साहाय्याने स्ट्राइक काउंट करणे
3) बॉल: डावा हात डोक्याच्या वर सरळ करणे व बॉल बोटांच्या साहाय्याने करणे
4) फूल काउंट : फूल काउंट स्ट्राइक असेल तर उजवा हात सरळ डोक्यावर करून मूठ बंद करणे मूठ बंद करून किकरकडे दर्शविणे
बॉल काउंट असेल तर डावा हात सरळ डोक्यावर करून मूठ बंद करून पिचरकडे दर्शविणे
बॉल फूल काउंट असेल तर दोन्ही हात डोक्यावर करून दोन्ही मूठ बंद करून पिचरकडे व किकरकडे दर्शविणे
5) सेफ पंचाने सेफ म्हणूण जोरात उच्चारणे व दोन्ही हात खांदयाच्या सरळ बाजूला ताठ करावे. हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने बोटे पूर्ण एकवटलेली
6) आउट : आउट म्हणूण जोरात शब्द उच्चारणे व उजवा हातचा कोपरा थोडा फोल्ड करून मूठ बंद असलेली जोरात किकरच्या दिशेने दर्शिविणे
7) टाइम आउट: डाव्या व उजव्या हाताचा सारखा आकार करावा व टाइम आउट म्हाणूण उच्चारणे
8) टाइम अप : दोन्ही हात डोक्याच्या वर करून टाइम अप म्हाणूण उच्चारणे
9) फाऊल हीट : ज्या दिशेने बॉल गेलेला असेल त्या दिशेला उभे राहून दोन्ही हात डोक्याच्या वर सरळ करून फाऊल म्हाणूण उच्चारणे
10) होमरन : तेव्हा उजव्या हाताची मूठ बंद करून हात डोक्यावर करून हाताची मूठ गोल फिरविणे
11) रनकाउंट : पंचानी थाडेसे गुडघ्यात हाताची तर्जनी प्लेटच्या दिशेने रन काउंट असे उच्चारणे
12) III बेसहीट : उजवा हात कानाच्या सरळ रेषेत वर करणे हाताची अंगठा तर्जनी व मधला बोट दर्शिविणे व शब्द उच्चारणे
13) इनफिल्ड फ्लाय रूल र्: उजवा हात छातीच्या समोर कापेयातून क्रा^स करावा व ते बेस अंपाायरला दर्शिविताना हात छातीला लावणे
14) इनफिल्ड फ्लाय रूल ओवर : डावा हात ताठ कंबरेजवळ नेणे बोटे एकवटलेली व उजव्या हाताने डाव्या हातावर हात घासने
15) इलिगल पिच : उजवा हात कानाच्या सरळ रेषेत वर करून हात पिचरच्या दिशेने करून जोराने शब्द उच्चारणे
16) बॉल इन प्ले : लाइनच्या बाहेर थांबुन दोन्ही हात खांदयाच्या रेषेत छाती समोर करून दोन्ही हाताच्या तर्जन समोर करणे
खेळाडू बाद होण्याच्या पद्धती (Reasons of Player Away)
1) किकींग बॉक्समधील खेळाडू तीन स्ट्राइक मारताना हुकला तर
2) खेळाडूने तीन स्ट्राइक जज केले तर
3) किकरने कॅच मारली तेव्हा फिल्डरने कॅच पकडला तर
4) किकरने बॉल मारला व क्षेत्ररक्षकाने बॉल पकडून Ist बेसकडे तो पोहचन्यापुर्वी फेकला Ist बेसने
बेसवर थांबून तो पकडला तर
5) किकरने बॉल मारला बेबवरून बेसरनर धावत असताना बॉल जर क्षेत्ररक्षकाने किकरला किंवा बेसरनराला
शरीरास लावला व बॉल जर हातातच राहीला तर
6) किकरने बॉल मारून Ist बेसकडे धावतान त्याने जर Ist बेसवर डाय स्कीट स्लाइड मारलीतर
7) किकरने मारलेला बॉल बेसरनरला त्याच्या शरीराच्या कोण्त्याही भागास लागला तेव्हा त्या बॉलच्या रेषेत
फिल्डर फिल्डींगसाठी उभा असेल तेव्हा क्षेत्ररक्षकास अडथळा केल्याबददाल बेसरनराला आउट दिले
जाते
8) किकर किंवा बेसरनर धावत असताना त्याने जर फिल्डर बॉल घेऊन त्याच्या शरीरास लावण्यास उभा
असेल तेव्हा रनर किंवा किकर त्याला चुकावून किंवा बेस पाथ रेषा सोडून बाहेरून पाळला तर|
9) किकरने बॉल हवेत मारला तेव्हा बा^ल हवेत असताना बेसरनरने बेस सोडली तेव्हा क्षेत्ररक्षकाने कॅच
पकडून बेसरनरच्या मूळ बेस वर थ्रो केला तर तेव्हा बेसरनर आपल्या मूळ बेसवर पोहोचला नसेल तर
10) बेसरनर बेस वर धावत असताना स्कीट मारली व तसेच तो बेसची जागा सोडून पुढे गेला तेव्हा त्याच्या
शरीरास बॉल लावल्यास
11) किकींग ऑर्डरमधील 4 नंबर किकर नंतर डायरेक्ट 6 नंबर किकर किकींग करून बेसवर गेला तेव्हा
विरूदध संघाच्या कोच किंवा कप्टनने त्याविरूदध आब्जेक्शन घेताल्यास तेव्हा पाच नंबर किकींग आला
असेल तेव्हा सहा नंबर ला आउट दिले जाते
12) किकरने जाणून बुजून कॅचरला किक मारली असल्यास
13) पिचींग फेकण्याच्या अगोदर बेसरनर बेस सोडल्यास व फिल्डरने अपील केल्यास
14) बेसरनर बेस टच न करता सेकंड बेसवर गेल्यास तेव्हा किंवा मागील बेस टच न करता पुढील बेसवर
पाहोचला तेव्हा व होमप्लेट देखील टच न करता बाहेर गेल्यास तेव्हा फिल्डरने बॉल शरीरास
लावल्यास
15) किकरने लाँग किक मारली व हवेत आहे तेव्हा पुढील बेस रनर धावत असताना मागील बेसरनर
पुढील बेसरनरच्या पुढे पळत जाऊन बेस किंवा होमप्लेट टच केली तर मागे राहिलेल्या बेसरनराला
बॉल शरीरास टच केला तर|
16) फाऊल लाइनमध्ये क^च उडाल्यास फिल्डरने कॅच फाऊल लाइनच्या आत पकडून फोल्लो थ्रो मध्ये बाहेर
गेल्यास तरीही